नेहमीच्या सततच्या गुडघेदुखीचा कंटाळा आला आहे…
हे वाक्य मी रोज ऐकतो… आणि खरं सांगू का? ही वेदना फक्त गुडघ्यांत नसते… ती मनात, आत्मविश्वासात आणि कुटुंबाच्या आनंदात शिरलेली असते.
गुडघा दुखतो म्हणजे फक्त “चालता येत नाही” असं नसतं… गुडघा दुखतो म्हणजे पिकनिकचा आनंद कमी होतो, देवदर्शनाचा उत्साह संपतो, नातवंडांबरोबर खेळता येत नाही, चार पायऱ्या चढतानाच जीव कासावीस होतो आणि मनात एक प्रश्न उभा राहतो —“आता माझं जगणं फक्त वेदनेतच जाणार का?”
ही गोष्ट एका कुटुंबाची…
साधारण साठीतले आई-वडील, त्यांची मुले आणि नातवंडं… नववर्षाची सुट्टी, सगळं कुटुंब एकत्र. घरात आनंदाचं वातावरण — “पिकनिकला जाऊया!”
“रिसॉर्टला जाऊ!”… हसणं, गप्पा, प्लॅनिंग… तेवढ्यात वडील म्हणाले — “आधी देवदर्शनाला गडावर जाऊया… मग पिकनिक.”
सगळे आनंदी… पण एक गोष्ट कुणाच्याही लक्षात आली नाही —त्या आईची गुडघेदुखी.
आई काही बोलली नाही… कारण तिला माहित होतं — “मी नाही म्हटलं तर घरचे नाराज होतील.” ती हसली… आणि म्हणाली — “हो… चला जाऊया.”
पण तिच्या मनात एकच भीती होती — “मी नाही गेले तर सगळ्यांचा आनंद बिघडेल… आणि गेले तर वेदना मला आनंद घेऊ देणार नाहीत…”
ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय?
ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे गुडघ्याच्या सांध्यातीलकार्टिलेज (cushion) हळूहळू झिजणे. हे कुशन कमी झालं की हाडं एकमेकांवर घासली जातात, सूज येते, वेदना वाढतात, चालताना त्रास होतो, बसून उठताना कळ येते आणि जिना चढणं अवघड होतं.
गुडघ्यांची झीज का होते?
१) वाढलेलं वजन
१ किलो वजन वाढलं की गुडघ्यावर ३–४ किलो ताण पडतो. १० किलो वजन वाढलं तर ३०–४० किलो अतिरिक्त ताण!
- गुडघ्याचा ताण कमी होतो
- सूज व जळजळ कमी होते
- वेदना कमी होतात
- चालण्याची क्षमता सुधारते
२) स्नायू कमकुवत होणे
Quadriceps, Hip muscles आणि Core muscles हे गुडघ्याला आधार देतात. हे स्नायू कमकुवत झाले की वेदना वाढतात.
- योग्य Physiotherapy strengthening
- Knee alignment correction
- सुरक्षित योगासने
३) चुकीचे पादत्राणे
चुकीच्या चपला किंवा शूजमुळे गुडघ्याची alignment बिघडते आणि झीज वेगाने वाढते.
उपचार म्हणजे फक्त Painkiller नाही
प्रभावी उपचार म्हणजे —Advanced Physiotherapy + Lifestyle + Naturopathy + Yoga
- Dry Needling
- Cupping Therapy
- Shockwave Therapy
- Manual Therapy
- TENS / Ultrasound
निसर्गोपचार आणि योग्य आहारामुळे फक्त गुडघेदुखीच नाही, तर Diabetes, BP, Obesity आणि Stress मध्येही फायदा होतो.
आता ठरवा…
- चालताना दुखत असेल
- जिना चढताना त्रास होत असेल
- गुडघा सूजत असेल
- X-ray मध्ये झीज दिसत असेल
तर आजच treatment plan सुरू करा. नववर्षाचा प्लॅन फक्त पिकनिकचा नको…आईच्या वेदनामुक्त जीवनाचाही प्लॅन करा.
“वेदना सहन करू नका… उपाय सुरू करा!”
“गुडघे बरे झाले, तर आयुष्य परत हसलं!”
डॉ. नितिन शिंपी
Physiotherapist | Yog-Naturopath Consultant (25+ Years Experience)
Ashirwad Physiotherapy & Wellness Centre
Contact: 9890656146 / 9890656147

